फलासक्तीविण कर्म
गीता (अ. २) :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥४७॥
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥४७॥
अर्थ : कर्म करणे हाच तुझा अधिकार आहे. फलाच्या ठिकाणी अधिकार दाखवू नकोस. तू कर्मफलाचे निमित्त कधी होऊ नयेस आणि अकर्माचे ठिकाणी तुझी आसक्ती नसावी.
ज्ञानेश्वरी (अ.२) :
म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥२६५॥
परी कर्मफळीं आस न करावी । आणि संगती न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥२६६॥
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥२६५॥
परी कर्मफळीं आस न करावी । आणि संगती न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥२६६॥
अर्थ : म्हणून अर्जुना, मी काय सांगतो ते ऐक. याप्रमाणे विचार केल्यास तुला युद्ध (स्वधर्म असल्यामुळे) करणेच योग्य आहे.
परंतु कर्म करीत असताना कर्मापासून मला इच्छित फळ प्राप्त झाले पाहिजे असे मात्र मनात धरू नये आणि कर्माचा त्यागही करू नये. ही स्वधर्मरूपी सत्क्रियाच हेतूशिवाय आचरणे योग्य आहे.
परंतु कर्म करीत असताना कर्मापासून मला इच्छित फळ प्राप्त झाले पाहिजे असे मात्र मनात धरू नये आणि कर्माचा त्यागही करू नये. ही स्वधर्मरूपी सत्क्रियाच हेतूशिवाय आचरणे योग्य आहे.
(श्रीज्ञानेश्वरी गुढार्थदीपिका, खंड १ला
: वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडीत, वरून)
: वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडीत, वरून)