अविनाशी आत्मा
गीतेचा श्लोक :
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२-२॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥२३॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ॥२४॥
ज्ञानेश्वरीतील ओवी :
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥४४॥
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥४५॥
अर्थ :
ज्याप्रमाणे पुरूष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करून घेतो.आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकऊ शकत नाही. या आत्माचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे किंवा शुष्क होणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल, सनातन आहे.
( हा अविनाशी असल्यामुळे तुला आप्तेंष्टाच्या मृत्यूभयाने शोक करणे उचित नाही. )
( श्री. दांडेकर महाराज संपादित वरून )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा